
सावंतवाडी : मोती तलावामध्ये सुरक्षिततेसाठी लाईफ जॅकेटचा वापर न करता पर्यटक नौकानयन करताना दिसत होते. सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेत हे बोटिंग करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिकांनी केल आहे. या बेजबाबदार पणाचा फटका पर्यटकांना बसू शकतो. यामुळे हानी होऊ शकते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाला लाईव्ह जॅकेट सक्तीचे करावे व सुरक्षतेतेच्या नियमांची कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी केली जात आहे.