विनापरवाना बैलाची वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल

Edited by: विनायक गांवस
Published on: May 30, 2025 11:30 AM
views 286  views

सावंतवाडी : विनापरवाना बैलाची वाहतूक केल्या प्रकरणी सावंतवाडी पोलीसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई आंबोली गेळे परिसरात करण्यात आली.  हे सर्व बैल अंबाडे आजारा येथे चालत घेऊन जात असतना आंबोली दूरक्षेत्र पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.

अंबाडे आजारा येथील चौघेजण चार बैल घेऊन सावंतवाडी ते आंबोली गेळे येथील रस्त्यावरून चालले होते.याची माहिती आंबोली दूरक्षेत्र पोलिसांना मिळाली त्यावरून संशयितांची चौकशी केली असता त्याच्या कडे कोणतीही कागद पत्रे नव्हती त्यामुळे पोलिसांकडून या चौघांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये पांडुरंग बापू पाटील दशरथ बाळू पाटील अशोक शांताराम पाटील रमेश सीताराम कांबळे  यशवंत बापू राणे ( सर्व राहणार अंबाडे, तालुका - आजरा, जिल्हा- कोल्हापूर) याचा समावेश आहे.

दरम्यान पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिलेल्या माहिती नुसार प्राण्यास निर्दयतेने वागणूक व प्राणी संरक्षण कायद्या नुसार त्यांचेवर  गुन्हा दाखल करून चार गोवंश हे सुरक्षितते करिता ताब्यात घेऊन गो शाळेत जमा करणेची कार्यवाही केली आहे.ही कारवाई स्थानिकांच्या मदतीने सावंतवाडी पोलिस स्टेशन नेमणुकी  हेड कॉन्स्टेबल रामदास जाधव, दीपक शिंदे, लक्ष्मण काळे, मनीष शिंदे वगैरे पथकाने केली. 

 कोणत्याही प्रकारे अवैध जनावरे वगैरे वाहतूक करू नये असे आवाहन पोलिसांनी केले असून अशा प्रकारे मिळून आल्यास रीतसर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्याचप्रमाणे कोणीही अशा  प्रकारची गोवंश वाहतूक बाबतीत माहिती असल्यास पोलिसांना संपर्क करावा परिसरात कोणतीही अयोग्य कृती करू नये.  कोणत्याही प्रकारे वाहतूक करणारे किंवा इतर लोकांविषयी माहिती दिल्यास त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.असे आवाहन पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याकडून करण्यात आले आहे.