
सावंतवाडी : वीज वितरणच्या नियोजनशून्य कामाचा फटका ग्राहकांना बसत आहे. पालकमंत्र्यांनी याबाबत आढावा बैठक घेत अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. यातच पुन्हा रविवारी सावंतवाडी शहरासह तालुक्यात बत्ती गुल्ल झाली. यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली.
सावंतवाडी शहर व आजूबाजूच्या गावातील परिसरातील विद्युत पुरवठा तांत्रिक बिघाड असल्याने बंद झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, साधारण एक ते दीड तासानंतर विद्युत पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती मिळत आहे. यातच वीज ग्राहक कक्ष स्थापन करून दिलेला टोल फ्री क्रमांक कुचकामी ठरत आहे. यावर संपर्कच होत नसल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. तर आपत्कालीन कक्षाचा क्रमांक व्यस्त असल्याने नियंत्रण कक्षाकडूनही वीज ग्राहकांच्या पदरी निराशाच पडली आहे.