
सावंतवाडी : अवकाळी पावसातच विद्युत वितरण कंपनी कोलमडली. सावंतवाडी शहरातील बत्ती चार तास झाले तरी गुल होती. तर ग्रामीण भागाची या पेक्षाही वाईट अवस्था असून या विरुद्ध संघटीत होऊन आवाज उठवण्यासाठी महावितरणला जाब विचारला जाणार आहे.
भरमसाठ बिले भरुन अंधारात राहयचे व कंपनीची भर करायची हे आता थांबलेच पाहिजे. यासाठी एकच संघटीत होऊन जाब विचारुया, त्यासाठी शुक्रवारी सकाळी ठिक ११वाजता विद्यूत वितरण कार्यालय सावंतवाडी येथे मोठ्या संख्येने जमण्याच आवाहन सामजिक कार्यकर्ते सीताराम गावडे यांनी केले आहे.