
देवगड : देवगड - जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक विद्यामंदिर या प्रशालेचा विद्यार्थी सार्थक सतीशकुमार कर्ले याला विज्ञान क्षेत्रातील विशेष योगदाना दिल्या सवित्र बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. राजवाडी उत्कर्ष मंडळ( नाटळ) मुंबई संचलित माध्यमिक विद्यालय नाटळ या प्रशालेत बाल दिनानिमित्त उमा भालचंद्र सावंत यांच्या संकल्पनेतून भगवान बापू तावडे यांच्या स्मरणार्थ 14 नोव्हेंबरला बाल दिनाचे औचित्य साधून "सवित्र बाल पुरस्कार "यंदापासून जाहीर करण्यात आला असून त्या पुरस्काराचे वितरण दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी माध्यमिक विद्यालय नाटळ येथे करण्यात आले.
विज्ञान क्षेत्रातील विशेष योगदाना बद्दल श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक विद्यामंदिर जामसंडे या प्रशालेचा विद्यार्थी सार्थक सतीशकुमार कर्ले.याला प्रदान करण्यात आला. सार्थक याने राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धा 2024 -2025 मध्ये सादर केलेल्या मासे विक्रेत्यांसाठी ट्रॉली या प्रतीकृतीला राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता. तसेच सार्थकची न्यू इंग्लिश स्कूल व तु. पुं. शेट्ये. कनिष्ठ महाविद्यालय लांजा येथे झालेल्या जिल्हास्तरीय इन्स्पायर मानक 2024 25 साठी निवड झाली होती.त्याने तयार केलेल्या Water drawing bucket from the well ही प्रतिकृती सादर केली. तिची निवड एस. जी. बी. डिफेन्स सर्विसेस ज्यु.कॉलेज शहापूर. तालुका -जिल्हा -भंडारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय इन्स्पायर मानकमध्ये निवड झाली आहे.सार्थक याला मिळालेल्या "सवित्र बाल पुरस्कार "बद्दल संस्था अध्यक्ष माजी आमदार अजित गोगटे कार्यवाहक प्रवीण जोग, शाळा समिती अध्यक्ष प्रसाद मोंडकर, प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील जाधव प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.










