28 रोजी सावंतवाडीत रंगणार सवेश नाट्यगीत गायन मैफिल

राजवाडा सभागृह येथे श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजन
Edited by: विनायक गांवस
Published on: November 23, 2025 15:35 PM
views 51  views

सावंतवाडी : श्री सद्‌गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळातर्फे दिनांक 5 नोव्हेंबर रोजी झालेल्या मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ठीक 5:00 वाजता सावंतवाडी राजवाडा सभागृह येथे सवेश नाट्यगीत गायन मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मैफिलीत सद्‌गुरु संगीत विद्यालयाचे विद्यार्थी विविध संगीत नाटकातील निवडक नाट्यपदे सादर करणार आहेत.  

        या कार्यक्रमास सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक व अभिनेते गणेश ठाकूर व ज्येष्ठ दिग्दर्शक व नाट्यकर्मी वसंत उर्फ भाऊ साळगावकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या मैफिलीस निलेश मेस्त्री, मंगेश मेस्त्री (ऑर्गन), मनीष पवार, पुरुषोत्तम केळुस्कर, साक्षी गांवकर, तन्वी मेस्त्री (हार्मोनियम), किशोर सावंत, निरज मिलिंद भोसले, सिद्धेश सावंत (तबला) हे साथसांगत करणार असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय कात्रे व सौ. आशा मुळीक करणार आहेत तर ध्वनी व्यवस्था विघ्नहर्ता साऊंड श्री हेमंत मेस्त्री - पडेलकर सांभाळणार आहेत.  

        तरी या संगीत मैफिलीस सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून या संगीत मैफिलीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्री निलेश मेस्त्री व सर्व पदाधिकारी व विद्यालयाच्या पालकवर्गानी केले आहे.