
सावर्डे : डेरवण येथे दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डेचा 14 वर्षांखालील मुलांचा कबड्डी संघ विजयी ठरला. या स्पर्धेत एकूण 24 शाळांचे संघ सहभागी झाले होते.
या स्पर्धेत विद्यालयाचे खेळाडू अथर्व रवींद्र घाणेकर, समर्थ एकनाथ घाणेकर, संस्कार घाणेकर, श्रेयश काटकर, मानव भुवड, द्रव घाणेकर, दिपराज चाळके, ओम घाणेकर, आर्यन घाणेकर, आर्यन यादव, आयुष्य राडे व सार्थक म्हादे यांनी उत्कृष्ट खेळ कौशल्याचे प्रदर्शन केले. अंतिम सामन्यात सावर्डेच्या संघाने सुमन महाविद्यालय, टेरव या संघावर मात करत विजेतेपद पटकावले. विजयी खेळाडूंचा शाळेत आगमनानंतर प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण व सर्व शिक्षकवर्गांनी सत्कार करून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना मार्गदर्शक म्हणून दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृत कडगावे आणि प्रशांत सकपाळ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
गोविंदराव निकम विद्यालयाचा हा विजयी संघ आता रत्नागिरी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम सचिव महेश महाडिक ज्येष्ठ संचालक व शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर संस्थेचे सर्व पदाधिकारी शालेय समितीचे सदस्य, प्राचार्य राजेंद्र वारे उपप्राचार्य विजय चव्हाण सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व क्रीडा प्रेमींनी शुभेच्छा दिल्या आहेत. यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करताना व उपप्राचार्य विजय चव्हाण