स्वातंत्र्यदिनानिमित्त रंगणार 'सावंतवाडी १२ तास रन' अभिनव उपक्रम..!

सिंधू रनर्स टीमचा पुढाकार
Edited by: विनायक गावस
Published on: July 13, 2023 20:44 PM
views 260  views

सावंतवाडी : देशाच्या 76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने सिंधू रनर्सने 'सावंतवाडी १२ तास रन' ही अभिनव संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने अत्यंत विधायक पाऊल उचलले आहे. सावंतवाडी १२ तास रन या अभिनव उपक्रमाच्या आरंभासाठी सिंधु रनर्स टीमने कोकणातील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम धावपटूंना या उपक्रमात सहभाग घेण्यासाठी आवाहन केले आहे. सावंतवाडी १२ तास रन पर्व तिसरे या उपक्रमाचे जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी स्वागत केले आहे. सहा-सहा तासांचे दोन सत्र आयोजित करून हा उपक्रम पार पडणार आहे. या उपक्रमामध्ये जिल्ह्यातून 10 ते 15 धावक तर पुणे, मुंबई, कोल्हापूर अश्या विविध जिल्ह्यातून 10 ते 15 उत्तम आणि उलत्रा रन करणारे धावक सहभागी होणार आहेत. उपक्रमाला रविवार दिनांक १३ ऑगस्ट २०२३ रोजी येथील राजवाडापासून सुरुवात होणार आहे. यावेळी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी  युवराज लखमराजे भोंसले (सावंतवाडी संस्थान), सौ. युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले (सावंतवाडी संस्थान), मुख्याधिकारी सावंतवाडी नगर परिषद, पोलीस निरीक्षक, (सावंतवाडी), रणजितसिंह राणे (अध्यक्ष एथलेटिकस फेडरेशन असोसिएशन सिंधुदुर्ग, अनु मोडक (जॉईंट सेक्रेटरी ऑफ गोवा जिम्नॅस्टिक असोसिएशन आणि सेक्रेटरी ऑफ गोवा क्रीडा भारती), जावेद शेख (अध्यक्ष ज्ञानदीप शिक्षण संस्था सिंधुदुर्ग, सागर चव्हाण (अध्यक्ष हुमन राईट्स असोसिएशन कोकण विभाग), डॉ बाबासाहेब पाटील (प्राध्यापक भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय, सावंतवाडी) आदींच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. सावंतवाडीसारख्या सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्राचा वारसा लाभलेल्या सुंदरवाडी या शहरात निसर्ग संपन्न वातावरणात जिल्ह्यातील नवोदित धावपटूंना स्वतःचे व्यासपीठ मिळवून देण्याचा सिंधू रनरचा हा प्रयत्न असणार आहे. तरी जिल्ह्यातील व कोकणातील धावपटूंनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधु रनर टीमने केले आहे. सहभागासाठी व अधिक माहितीसाठी सिंधु रनरचे ओंकार पराडकर ९४२०३०७१८७, प्रसाद कोरगावकर ७७५६०९५०५१, डॉ. स्रेहल गोवेकर ९४२२३७३९२२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सिंधु रनर्स टीमने केले आहे.

अशी होणार सावंतवाडी बारा तास

१२ तास रन आणि ६ तास रन सत्र १:

सकाळी ४:३० : सर्व सहभागी धावपटू आणि निमंत्रित मान्यवर सावंतवाडी राजवाडा मुख्य दरवाजा जवळ जमतील

सकाळी ५:०० : मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून आणि धावकांना पताका दाखवून रन ला सुरवात होईल. सर्व धाविक सावंतवाडी मोती तलावाला एक चक्कर पूर्ण करून गवळी तिठा, श्री देव उपरालंकार कडून बुर्डी पूल मार्गे कोळगाव निरूखेवाडी रस्त्याला जातील. 

१२ तास रन करणारे धावक पूर्ण दिवस कोलगाव हायस्कूल ते बुर्डी पूल हे २.५ किलोमीटर अंतर लूप मध्ये पाळतील आणि ६ तास रन करणारे धावक दुपारी ११ पर्यंत कोलगाव हायस्कूल ते बुर्डी पूल हे २.५ किलोमीटर अंतर लूप मध्ये पळतील.

सकाळी ११:००: ६ तास सत्र १ मधील धावकांचा ओंकार नवरात्र मंडळ कोलगाव निरूखेवाडी येथे (Hydration point ) संन्मानचिन्न देऊन सत्कार करण्यात येईल.

 ६ तास रन सत्र 2:

सकाळी १०:३० : सर्व सहभागी धावपटू आणि निमंत्रित मान्यवर ओंकार नवरात्र मंडळ कोलगाव निरूखेवाडी जवळ जमतील

सकाळी ११:०० : मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून आणि धावकांना पताका दाखवून रन ला सुरवात होईल. ६ तास रन करणारे धावक दुपारची वेळ कोलगाव हायस्कूल ते बुर्डी पूल हे २.५ किलोमीटर अंतर लूप मध्ये पळतील.

संध्याकाळी ४:०० : ६ तास आणि १२ तास रन करणारे धावक कोलगाव निरूखेवाडी वरून निघून बुर्डी पूल, श्री देव उपरालंकार, गवळी तिठा मार्गे सावंतवाडी राजवाडा मुख्य दरवाजा पार करून आपली १२ तास किंवा ६ तास धाव संध्याकाळी ५:०० पूर्ण करतील.

संध्याकाळी ५:३० ते ७:०० मान्यवरांच्या हस्ते सर्व धावकांचा सन्मानचिन्न देऊन सत्कार करण्यात येईल तसेच मान्यवरांना व धावकांना आपले मनोगत पण व्यक्त करता येईल.