सावंत फाऊंडेशनच्या विज्ञान प्रयोगशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

Edited by: समीर सावंत
Published on: November 30, 2023 18:33 PM
views 223  views

कणकवली : सावंत फौंडेशन गेली 20 वर्षे सिंधुदुर्ग मध्ये शैक्षणिक, आरोग्यविषयक, सांस्कृतिक, सामजिक आणि शेतकी विषयावरील विविध उपक्रम राबवत आहोत. या वर्षी सावंत  फौंडेशन संचलित डॉ रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र आणि डॉ होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन (HBSCE) आणि टाटा इन्स्टिट्यूट फॉर फंडामेंटल रिसर्च (TIFR)आणि इतर संस्था यांच्या सहकार्यातून तीन दिवसांचा  विज्ञान प्रात्यक्षिक कुडाळ हायस्कुल कुडाळ येथे प्रयोगातून विज्ञान चा दुसरी कार्यशाळा 30 नोव्हेंबर 2023 ते 2 डिसेंबर 2023 पर्यंत चालणार आहे. प्रयोगातून विज्ञानची पहिली कार्यशाळा कणकवली मधील विद्यामंदिर शाळेमध्ये 10,11,12 ऑगस्ट रोजी यशस्वी पार पाडण्यात आली त्याला शिक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. 


विज्ञान प्रयोगांची ही संस्कृती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे.  विद्यार्थ्यांच्या विज्ञान संकल्पना अधिक दृढ करण्यासाठी प्रथम त्यांच्या शिक्षकांना अशा सोप्या विज्ञान प्रयोगांची ओळख करून देणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना हे प्रयोग विद्यार्थ्यांपर्यंत नेण्यात आत्मविश्वास वाटेल. शाळेत मोठ्या उत्साहाने शिकवल्या जाणाऱ्या सिद्धांताला पूरक होण्यासाठी हे प्रयोग अत्यंत आवश्यक आहेत. 

पहिल्या दिवसाचा अनुभव सांगताना काही शिक्षकांनि आपले मनोगत व्यक्त करताना अश्या कार्यशाळेची संकल्पना विद्यार्थी व  शिक्षकांसाठी खूप उपयुक्त असल्याचे सांगितले