सावडाव ग्रामपंचायतचा अजब कारभार !

ठराव इतिवृत्तात खोडला : सतीश सावंत
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 27, 2023 11:04 AM
views 668  views

कणकवली : सावडाव येथे श्री. नरसाळे यांनी आपल्या जागेत बीएसएनएल टॉवरसाठी एनओसी मागितली. पण त्यांना यापूर्वी शासकीय जागेत एनओसी देण्यात आलेली असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ती जागा देवराईची होती. तसेच ज्या ठरावाने एनओसी देण्यात आली तो ठराव इतिवृत्तात खोडलेला असल्याचा आरोपही श्री. सावंत यांनी केला. असे असेल तर तो ठराव ग्राह्य कसा ? श्री. नरसाळे यांना ठराव का दिला जात नाही ? असा सवाल करत मासिक सभेच्या खोडण्यात आलेल्या ठरावप्रकरणी कारवाईची मागणी माजी बँक जिल्हा अध्यक्ष तथा उबाठा शिवसेनेचे कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी केली.

सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रा. पं. विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, वैभव सावंत, नयना सावंत, व्यंकटेश वारंग, अजय जाधव, आनंद नरसाळे, सुहास पाताडे, संतोष तेली, सागर पेडणेकर व इतर उपस्थित होते.यावर झालेल्या चर्चेअंती अपील दाखल करा, सुनावणी घेऊन कार्यवाही करण्यात येईल असे श्री. चव्हाण यांनी सांगितले. सावडाव येथे बीएसएनएल टॉवरसाठी देवराईच्या जागेत टॉवर उभारण्यास ग्रा.पं.कडून ना हरकत देण्यात आली. मात्र, नंतर तो ठराव खोडण्यात आला आहे. असे असेल तर ज्या ग्रामस्थांनी एनओसीची मागणी केली, त्यांना एनओसी का दिली जात नाही ? तसेच ग्रामपंचायतीकडून कोटेशन घेऊन बाजारात ३ हजार रुपयाने मिळणारे डस्टबीन ८ हजाराने खरेदी केल्याचाआरोप जि. प. माजी अध्यक्ष तथा उबाठा शिवसेनेचे कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी केला. तर याप्रकरणी आपल्याकडे अपील दाखल केल्यानंतर चौकशीअंती पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी सांगितले. तसेच ग्रामपंचायतीकडून तीन कोटेशन घेऊन तीन हजार रुपयांप्रमाणे मिळणारे डस्टबीन ८ हजार रुपयांना खरेदी करण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच याबाबत तक्रार करूनही कार्यवाही होत नाही. तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींसाठी हाच दर आहे का ? इतर ठिकाणी याप्रकरणी चौकशी करून दर घेऊन कारवाई व्हायला हवी अशी मागणीही करण्यात आली. तर याप्रकरणी चौकशी करून कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले. यावेळी अंगणवाडी पोषण आहार तसेच १४ वित्त आयोगातील इतर खरेदीबाबतही लक्ष वेधण्यात आले. यावेळी सदस्यांना तातडीने इतिवृत्ताची प्रत मिळावी, ती मिळत नाही. याकडेही लक्ष वेधण्यात आले. तसेच सभा झाल्यानंतर नोटीसबोर्डवर इतिवृत्त लावण्यात यावीत,
अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान, पहिल्यांदा एनओसी दिली असल्याचे सांगून श्री. नरसाळे यांना एनओसी नाकारण्यात आली आहे. मात्र, तो ठरावच खोडलेला असल्याने त्यांना एनओसी द्या, अशी मागणी करण्यात आली. याबाबत अपील दाखल केल्यानंतर योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे गटविकास अधिकारी श्री. चव्हाण यांनी सांगितले.