साटेली - भेडशी नदीवरील पूल वाहतुकीस तात्पुरता खुला

Edited by: ब्युरो
Published on: July 05, 2023 20:41 PM
views 62  views

साटेली - भेडशी : साटेली भेडशी खालचाबाजार येथील नदीवर नव्याने उभारण्यात येणारा पूल पावसाळ्यात तात्पुरता सुरु व्हावा अशी मागणी नागरिक व वाहनचालकातून होत होती या पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने जवळपास 70 टक्के काम पूर्ण करून पावसाळ्यात तात्पुरत्या स्वरूपात पुलावरून वाहनानची वाहतूक सुरु झाल्याने वाहन धारकांसह नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

           साटेली भेडशी खालचाबाजार येथील नदीवर पाटबंधारे विभागामार्फत कॉजवे बांधण्यात आला होता दोडामार्ग सह कोल्हापूर, बेळगाव, गोवा आदी राज्याना जोडणारा हा महत्वाचा राज्य मार्ग असल्याने पावसाळ्यात हा कॉजवे सातत्याने पाण्याखाली जात असल्याने याठिकाणी मोट्या पुलाची आवश्यकता होती. ती लक्षात घेऊन शासनाने याठिकाणी पुलाला मंजुरी देऊन कामाला सुरवात झाली होती. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस बंद होता. तर उन्हाळ्यात पर्यायी रस्त्याने वाहतूक सुरु होती. मात्र हा पर्यायी रस्ता बऱ्याच ठिकाणी अरुंद व वाळणांचा असल्याने अनेकदा वारंवार वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत होती. तर पावसाळ्यात अनेक ठिकाणी झाडी रस्त्यावर येते असल्याने वाहन धारकांना त्रासदायक ठरणार होते.

        त्यामुळे या नदीवर उभारण्यात येणारा पूल पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावा अशी मागणी होत होती. मात्र अहोरात्र काम करूनही ठेकेदार जवळपास 70 टक्के पुलाचे काम पूर्ण करू शकला. मात्र तरीही पुलावरून वाहने वाहतूक करू शकतील याची काळजी ठेकेदार याने घेतल्याने पावसाळ्यात तात्पुरता का होईना पुलावरून वाहतूक सुरु झाल्याने नागरिकांसह वाहन चालकातून समाधान व्यक्त होत आहे.