
दोडामार्ग : जिल्हा परिषद सासोली-हेदुस मराठी शाळेत आषाढी एकादशी निमित्त मराठी शाळा ते मुख्य रस्ता येथे विठ्ठल नामाचा जयघोष करत विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाचा जयघोष करत एकादशी निमित्त वारी काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.
वारीच्या गणवेशात विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला. विठू नामाचा गजर करत संपूर्ण सासोली-हेदुस परिसर विठ्ठलमय विद्यार्थ्यांनी केला. टाळ मृदुंगाच्या गजरात वारी मध्ये अनेक पालक देखील सहभागी झाले होते. यात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर नाईक, उपाध्यक्ष श्रीमती पूजा धाऊसकर, शिक्षण प्रेमी आपा धुरी व संतोष धाऊसकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य भूषण सावंत, मुख्याध्यापक संदीप सावंत, उपशिक्षिका सुप्रिया गोसावी, अंगणवाडी सेविका श्रीमती सरीता धाऊसकर, मदतनीस मंदा धाऊसकर, आशाताई सौ.पालव यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.