YCMOUच्या पोस्टर पेंटिंगमध्ये सर्वेश खांबल प्रथम

Edited by: लवू परब
Published on: October 15, 2025 13:34 PM
views 103  views

दोडामार्ग : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विद्यापीठात सर्वेश मधुसूदन खांबल याने पोस्टर पेंटिंगमध्ये प्रथम क्रमांक पटकवीत घवघवीत यश संपदीत केले आहे.

नाशिक येथे झालेल्या 8 विभागाच्या स्पर्धा मधून रावसाहेब गोकाटे कॉलेज ऑफ कॉमर्स, श्रीमती सरस्वती बाई गनशेट वाळके कॉलेज ऑफ आर्टस संचलित दोडामार्ग अभ्यासकेंद्राचा विद्यार्थी प्रथम सर्वेश खांबल याने प्रथम क्रमांक घेऊन यशस्वी झाला आहे. आणि जळगाव येथे होणाऱ्या इंद्रधनुष या स्पर्धे साठी त्याची निवड झाली आहे. अभ्यासकेंद्राचे केंद्रसंयोजक प्रा. दशरथ राजगोळकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर विविध स्तरातून त्याचे अभिनंदन केले जातं आहे.