
सावंतवाडी : जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामाबाबत आज 1 वा. वाजत राणी पार्वती देवी हायस्कूल सभागृह येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, दुपारी साडेतीन वाजेपर्यंत देखील मुख्य कार्यकारी अधिकारी बैठकीस उपस्थित न राहिल्याने तालुक्यातील सरपंचांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. जलजीवन सारख्या मुलभूत विषयात शासनाला गांभीर्य नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली.
राज्य सरकार व पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून उन्हाळ्यात पाण्यापासून जनतेला वंचीत रहाव लागू नये त्यांची असुविधा निर्माण होऊ नये यासाठी दक्षता घेतली. यानुसार जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामाबाबत आज बैठकही लागली. तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच,मक्तेदार, यांना आमंत्रित करण्यात आले. मात्र, दुपारपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा पत्ता बैठकीच्या ठिकाणी नव्हता. जलजीवन सारख्या मुलभूत प्रश्नी जिल्हा प्रशासन गंभीर नसल्याने संतप्त सरपंचांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. शासनाला गांभीर्य नसल्याने निषेध नोंदवला. तसेच ग्रामीण पाणीपुरवठा उप अभियंता संदीप राणे यांच्या कारभाराबाबत तक्रारी असून जलजीवन हे जलमरण झाल्याची संतप्त प्रतिक्रिया सरपंचांनी दिली आहे.