सरमळे देऊळवाडी रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ..!

Edited by: विनायक गावस
Published on: February 21, 2024 13:35 PM
views 54  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील सरमळे देऊळवाडी रस्त्याचे अर्थसंकल्पीय बजेटमधून सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सरमळे देऊळवाडी रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी तीस लाख निधी मंजूर केला. त्याचा शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आला.

त्यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष. गजानन नाटेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनायक दळवी, माजगांव शिवसेना विभागप्रमुख उमेश गांवकर, सरमळे शाखाप्रमुख संजय गावडे, सरमळे सरपंच विजय गावडे, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष राजन रेडकर, चंद्रकांत गावडे, विठ्ठल गावडे, ग्रा.पं.सदस्य सौ. संजना सावंत व दिव्या गावडे, ग्रामस्थ नाना गावडे, संतोष सरमळकर, राजन कांबळे, एकनाथ हळदणकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सरमळे देऊळवाडी मुख्य रस्त्याचे डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल ग्रामस्थांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आभार व्यक्त केले आहेत.