नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल नडगिवे मध्ये सरस्वती पूजन उत्साहात..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 23, 2023 11:28 AM
views 89  views

कणकवली : आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल नडगिवे मध्ये सरस्वती पूजन करण्यात आले. शालेय परिपाठ झाल्यानंतर मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई यांच्या हस्ते सरस्वती देवीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर इयत्ता सहावीतील विद्यार्थिनींनी सरस्वती वंदना सादर केली. प्रशालेतील संस्कृत विभाग प्रमुख ओंकार गाडगीळ यांनी सरस्वती पूजनाचे महत्त्व विशद केले.

त्यानंतर इयत्ता सातवीतील विद्यार्थिनींनी संगीत विभाग प्रमुख हेमंत तेली रचित सरस्वती मातेच्या चरणी लीन होणारी सरस्वती प्रार्थना सादर केली.यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वर भाषण केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी जोया पटेल हिने केले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते.