सरस्वती लक्ष्मण पवार साहित्य पुरस्कार डॉ. रुपेश पाटकर यांच्या 'अर्जमधील दिवस' पुस्तकाला | ३ ऑगस्टला वितरण

Edited by: भगवान शेलटे
Published on: August 01, 2023 14:35 PM
views 250  views

सावंतवाडी : सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान कणकवलीतर्फे दिला जाणारा दुसरा सरस्वती लक्ष्मण पवार साहित्य पुरस्कार डॉ. रुपेश पाटकर यांना सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर  सभागृहात  गुरुवार ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार ते साडेपाच या दरम्यान प्रदान करण्यात येईल. त्यांच्या " अर्जमधील दिवस " या पुस्तकाला हा पुरस्कार लाभला आहे.

यावेळी अलीकडेच सिंधु वैभव साहित्य समूहाचा मधुसूदन नानिवडेकर पुरस्कार मिळालेल्या कवयित्री अंजली मुतालिक यांचा सत्कार करण्यात येईल. या कार्यक्रमाला डॉ. संजीव लिंगवत, वेंगुर्ला आणि  कोकणसाद LIVE च्या संपादिका देवयानी वरसकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच अन्यायरहित जिंदगी या शरीर विक्री व्यवसायातील समस्येवर काम करणारे अरुण पांडे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.

गेल्यावर्षी हा पुरस्कार मिळालेल्या दिशा पिंकी शेख या कार्यक्रमात ऑनलाईन सहभाग घेणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानच्या शुभांगी पवार यांनी केले आहे.