
दोडामार्ग : वायंगणतड येथील अपघातात घोटगेवाडीतील संतोष मधुकर शेटकर (वय 52) यांचा मृत्यू झाला. भाजीवाहू करणाऱ्या पिकअपने स्कूटरला धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेटकर यांचा अखेर मृत्यू झाला. तर त्यांच्या स्कूटरवर मागे बसलेली महिलाही गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.