
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पक्षाच्या सावंतवाडी विधानसभा संघटनात्मक निवडणूक मंडल अध्यक्ष प्रकीया अंतिम टप्यात पार पडली. यावेळी आंबोली मंडल अध्यक्षपदी संतोष अरूण राऊळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हाअध्यक्ष प्रभाकर सावंत व जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी या नियुक्तीनंतर त्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई,जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव, तसेच माजी आंबोली मंडल अध्यक्ष रविंद्र मडगांवकर, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, महीला मंडल अध्यक्षा प्राजक्ता केळुस्कर,दिनेश मंडल उपाध्यक्ष सारंग विरेंद्र धुरी, सुनिल परब, वामन पालयेकर, सावित्री पालयेकर, दादा परब, संदीप हळदणकर, गुरू मठकर, अब्दुल साठी,सिध्देश तेंडोलकर, योगेश गवळी, बाळकृष्ण सावंत, संदेश सावंत, प्रशांत राऊळ, आनंद तळवणेकर,रामचंद्र गावडे, आत्माराम चव्हाण, राजाराम धुरी, भगवान राणे, सुशांत गावडे, लक्ष्मण राऊळ, रामचंद्र सावंत, रूपेश कुडतरकर, रामचंद्र करमळकर, दिपक सावंत, चंद्रकांत म्हाडगुत, राकेश ठाकूर, प्रविण सावंत, सुमित राऊळ, विशाल गुरव, मुकेश मोहीते, मंगलदीप पवार, रोशन ठाकूर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. संतोष राऊळ यांच्या नियुक्तीमुळे आंबोली मंडळात पक्षाच्या कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास प्रभाकर सावंत व महेश सारंग यांनी व्यक्त केला आहे. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संतोष राऊळ यांचे अभिनंदन करीत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संतोष राऊळ यांची ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.