
वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुका संजय गांधी निराधार योजना अध्यक्षपदी भाजपा वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष तथा पेंडुरचे माजी सरपंच संतोष गावडे यांची निवड झाली आहे. या समितीवर महिला अशासकीय प्रतिनिधी म्हणून श्रद्धा गोरे यांची तर इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी म्हणून प्रशांत नवार, सर्वसाधारण प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी म्हणून साईप्रसाद नाइ्रक, अपंग प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी म्हणून मनोज उगवेकर, सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती म्हणून अनंत केळुसकर, ज्येष्ठ नागरिक अशासकीय प्रतिनिधी म्हणून रामकृष्ण सावंत, शासकीय प्रतिनिधी म्हणून वेंगुर्ला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ व सचिव म्हणून वेंगुर्ला तहसिलदार ओंकार ओतारी या समितीवर काम पाहणार आहेत.