
कणकवली: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वरवडे गावात सरपंच पदासाठी भाजपच्या दोन गटात चुरस होती. आणि त्या चुरशीमध्ये करुणां घाडीगांवकर ह्या निवडून आल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे जवळचे मानले जाणारे संतोष चव्हाण यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी बहुसंख्य वरवडे ग्रामस्थ उपस्थित होते