घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत संतोष गांवस प्रथम..!

Edited by: विनायक गावस
Published on: October 03, 2023 18:31 PM
views 120  views

सावंतवाडी : डी. वाय. फाउंडेशनच्या माध्यमातून व डी. वाय. फॉउंडेशन अध्यक्ष योगेश पाटील, सरचिटणीस महाराष्ट्र युवक काँग्रेस विरेन दयानंद चोरघे  व संस्थापक अध्यक्ष डी. डाय फाउंडेशन दयानंद मोतीराम चोरघे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत दोडामार्ग तालुक्यातील बाळा धाऊस्कर व सावंतवाडी तालुक्यातून संतोष गांवस प्रथम तर विर्नोडकर कुटुंबीय यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ही बक्षिस प्रदान करण्यात आली. डीवाय फाउंडेशनचे सदस्य संतोष तळवणेकर, शिवा गावडे, रामचंद्र कुडाळकर अमित तळवणेकर मंगेश माणगावकर .ज्ञानेश्वर पारधी . यांच्या उपस्थितीत ही बक्षिस प्रदान करण्यात आली.