युवासेनेच्या प्रश्नांना संताजी रावराणे यांच उत्तर..!

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 22, 2023 12:49 PM
views 303  views

वैभववाडी : कणकवली मतदारसंघातील कामाबाबत युवासेना ठाकरे गटाकडून सुरू असलेल्या बॅनरबाजीला भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले. भाजपचे माजी नगरसेवक संताजी रावराणे यांनी पत्रके वाटून उत्तर दिले आहे.

कणकवली विधानसभेत सध्या बॅनर वाद सुरू आहे.आ.नितेश राणे यांनी सात वर्षांत काय केले या आशयाचे युवासेनेने सर्वत्र बॅनर लावले.या बॅनरच्या माध्यमातून आ.राणेंना प्रश्न विचारले आहेत.यावरून मतदारसंघात वातावरण तापले होते.

युवासेनेच्या या प्रश्नांना वैभववाडीत संताजी रावराणे यांनी उत्तर दिले आहे. आ. राणे यांनी सात वर्षांत वैभववाडी तालुक्यात केलेल्या कामांची पत्रके छापली आहेत. ही पत्रके तालुक्यातील जनतेपर्यंत पोहचवली. या पत्रकामध्ये तालुक्यातील रस्ते, महाराणा प्रतापसिंह कलादालन, सेल्फी पाॅईंट, नगरपंचायत इमारतीसह शहरातील विकास कामांसाठी आणलेल्या निधीचा  उल्लेख करण्यात आला.रावराणे यांनी ही पत्रके वाटून युवासेनेला सडेतोड उत्तर दिले आहे.