
सावंतवाडी : वैदिक सनातन परंपरा आणि परमेश्वराच्या नवविधा भक्ती पैकी एक सेवा म्हणजे 'कीर्तनसेवा'. सोमवार दि २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्त त्यांच्या चरणी आपली यथाशक्ती सेवा घडावी या उद्देशाने कीर्तनप्रेमी मित्रमंडळाने कीर्तनसेवा आयोजित केली आहे.
कीर्तनकार ह.भ.प.सौ.संज्योतताई केतकर, पुणे यांचं किर्तन श्री देव विठ्ठल मंदिर,भटवाडी-सावंतवाडी येथे सोमवार दि. २२ जानेवारी २०२४ वेळ सायंकाळी ठिक ७.०० वा. होणार आहे. साथसंगत हार्मोनियम निलेश मेस्त्री, सावंतवाडी तबला किशोर सावंत, सावंतवाडी पखवाज आबा मेस्त्री, कुडाळ करणार आहेत.तरी सर्व कीर्तनप्रेमींनी कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा व श्री प्रभुरामचंद्रांचे आशीर्वाद घ्यावेत असं आवाहन कीर्तनप्रेमी मित्रमंडळान केलं आहे.