संजू शिरोडकर यांच्या शॉपला नितेश राणेंची सदिच्छा भेट

Edited by: विनायक गावस
Published on: November 08, 2023 18:20 PM
views 340  views

सावंतवाडी : आमदार नितेश राणे यांनी भारतीय जनता पार्टीचे माजी सावंतवाडी शहर अध्यक्ष अँड. संजू शिरोडकर यांच्या उभा बाजार येथील ज्वेलर्स शॉपला सदिच्छा भेट शुभेच्छा दिल्या. यावेळी संजू शिरोडकर व कुंटुबियांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर, गजानन गावडे, भाजपचे तालुकाध्यक्ष महेश धुरी, महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर, माजी जि.प. सभापती गुरुनाथ पेडणेकर, माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, उदय नाईक, दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, सुवर्णकार राजू पनवेलकर, विराग मडकईकर आदी उपस्थित होते.