
दोडामार्ग : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत हे जिल्ह्यात सक्षम आहेत. तसेच त्यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळे भाजप जिल्ह्यात अग्रेसर आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले की, प्रभाकर सावंत यांचा बोलविता धनी कोणी दुसरा आहे. मात्र श्री. सावंत यांचा बोलविता धनी कोणीही नसून संजू परब यांना अगर माहिती असेल तरच त्यांनी ते जाहीर करावे अशी बेताल वक्तवे करू नयेत. परब यांनाच उबाठा पक्षाची कुबडी वापरून निवडणुका लढवाव्या लागतात आणि त्यांनी आमच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर असे आरोप करणे हे त्यांना शोभत नाही असे जोरदार प्रत्युत्तर भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिले आहे.
श्री. दळवी पुढे म्हणाले की, आमचे जिल्हाध्यक्ष हे सक्षम जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना दुस-यांचे कुबडे घेण्याची गरज नाही. संजू परब व त्यांच्या पदाधिकारी यांना सवय आहे दुस-यांचे कुबडे घेण्याची. त्यामुळे आमच्या जिल्हाध्यक्षांवर आरोप करण्यापूर्वी आपण किती खोलात आहोत ते तपासावे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत त्यांच्याच मार्गदर्शनामुळे विजयी मताधिक्य मिळाले आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा बोलवता धनी कोण ? हे जर संजू परब यांना माहिती असेल तर त्यांनी जाहीर करावे उगाच बेताल वक्तवे करु नये. स्वबळाची भाषा संजू परब यांनी केलेली आहे हे विसरू नये. संजू परब यांना आता का मिरच्या झोंबल्या आताच त्यांना प्रभाकर सावंत यांचे बोलावते धनी वेगळे आहे यांची भविष्यवाणी झाली. प्रभाकर सावंत यांचे कार्य तत्पर व कार्यकर्त्याची जाण असलेले जिल्हाध्यक्ष असल्याचे त्यांनी सिद्ध करुन दाखवले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणूकित त्यांच्याच अध्यक्षतेखाली पार पडलेल्या असून विजयी मताधिक्य मिळालेलं आहे. त्याच्यावर टीका करण्याचा अधिकार संजू परब यांना नाही. पक्ष संघटनात्मक हित लक्षात घेऊन जिल्हाध्यक्ष काम करत आहेत त्यामुळे त्यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. त्यामुळे दुस -यांचे कुबडे घेऊन विजयी झाल्याचे गाजवणा-या संजू परब यांना संघटना व कार्यकर्त्याच्या भावना काय समजणार आहेत. उबाठाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाण्यात बघतात त्याच उबाठाच्या कार्यकर्त्याच्या कुबड्या घेऊन त्यांच्या सोबत युती करुन दोडामार्ग मधील सोसायटी निवडणुका आपण जिंकल्या असे म्हणतात. पण त्या कशा जिंकलो याचे देखील आत्मपरीक्षण संजू परब यांनी करणे गरजेचे आहे. आणि त्यानंतरच त्यांनी आपली बेताल वक्तवे करावी. आमच्या जिल्हाध्यक्ष यांनी स्वबळावर निवडणुका लढवणार असे बोलल्यावर संजू परब यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने हतबलं होऊन दिशाभूल करणारी वक्तवे करत आहेत.
संजू परब यांनी स्वबळावर निवडणूक लढवाव्या आणि नंतरच सोसायटी निवडणुकांवर बोलाव सोसायटी या उबाठाच्या कार्यकर्त्याच्या जीवावर जिकंलेल्या आहेत. जर कोलझर सोसायटी आपली म्हणत असतील तर संजू परब यांना जाहीर आव्हान आहे. कोलझर सोसायटीचे चेअरमन कोणत्या पक्षाचे आहेत ते त्यांनी जाहीर करावं. फक्त फोटो दाखवून सगळे आपलेचं आहे म्हणणे हे संजू परब यांना शोभत नाही. आपले कोण आणि विरोधी कोण यांचे आत्मपरीक्षण महायुती टिकवायची असेल तर संजू परब यांनी करणे गरचेचे आहे. उगाच प्रसिद्धी मिळवण्यासाठी जिल्हाध्यक्ष यांच्यावर टीका करणे योग्य नाही असेही दळवी यांनी स्पष्ट केले आहे.