सावंतवाडी : शहर भाजपची कार्यकारीणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी जाहीर केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहर मंडळाली कार्यकारिणी गठीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षपदी अजय गोंदावळे यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांची फेरनिवड करण्यात आल्याची माहिती संजू परब यांनी दिली.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सरचिटणीस महेश सारंग यांच्या शिफारशीनुसार ही तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहर मंडळाली कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून शहराध्यक्ष पदी अजय गोंदावळे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष सत्यवान बांदेकर, गुरूदास मठकर, अनिल सावंत, मयुर लाखे, संदेश टेमकर तर सरचिटणीस विनोद सावंत, परिक्षित मांजरेकर यांची निवड करण्यात आली. संजय वरेरकर, कृष्णा लाखे चिटणीस व सोशल मीडिया प्रमुखपदी किशोर चिटणीस, प्रवक्तेपदी अँड. संजू शिरोडकर यांची नियुक्ती करण्यात आली. महिला मोर्चा अध्यक्षपदी मोहीनी मडगावकर तर प्रभारीपदी उत्कर्षा सासोलकर यांची निवड करण्यात आली.
तसेच निमंत्रित सदस्य पदी कुणार शृंगारे, निशिकांत तोरसकर, आनंद नेवगी, राजू बेग, यशवंत कोरगावकर, उदय नाईक, अँड. परिमल नाईक, सुधीर आडिवरेकर, नासीर शेख, समृद्धी विर्नोडकर, दिपाली भालेकर यांची निवड जाहीर करण्यात आल्याचे भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी सांगितले. तसेच केतन आजगावकर यांच्या ऐवजी प्रवक्ते म्हणून अँड. संजू शिरोडकर तर प्रभारी महिला अध्यक्षा म्हणून अनुभवी माजी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर यांना संधी देण्यात आल्याची माहिती संजू परब यांनी दिली.यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, परिक्षित मांजरेकर, मोहीनी मडगावकर, संजय वरेरकर, विनोद सावंत, क्लेटस फर्नांडिस आदी उपस्थित होते.