लॅंडमाफीयांना आमदार व्हायचंय

संजू परब यांचा हल्लाबोल
Edited by: विनायक गांवस
Published on: September 19, 2024 12:13 PM
views 875  views

सावंतवाडी : मतदारसंघात काही लॅंडमाफीया धुडगूस घालत आहेत. काहींना आमदार व्हायचे आहे. जनतेच्या जमिनी घेऊन त्या गोरगरिबांचे पैसे ठेवत आहेत. स्वतः ला भविष्यात होणारी अटक टाळण्यासाठी आमदार होण्याची स्वप्न बघत आहेत. अशा लोकांपासून जनतेन सावध रहावे. या लॅंडमाफीयाचे नाव व प्रताप भविष्यात पुराव्यासकट व त्या गोरगरिबांना सोबत बसवून जाहीर करेन असा इशारा भाजपचे उपाध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे. 


ते म्हणाले, काही दिवस मी गप्प होतो. माझ्या नेत्यांनी तोंडाला आवर घाल अस सांगितले होते. मात्र, माझ्या नेत्यांनी आता मला बोलण्याची मुभा दिली आहे. नेत्यांकडून ग्रीन सिग्नल मला मिळाला आहे. त्यामुळे या लॅंडमाफीयाचे नाव ज्या  गोरगरिबांच पेमेंट झाली नाहीत म्हणून रडत आहेत अशांना सोबत घेऊन जाहीर करेन असा प्रहार केला. लोक दोन-दोन वर्षे त्यांच्या कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. त्यामुळे यापुढे जनतेन आशांपसुन सावध रहावे,बळी पडू नये, आजपासून माझी भुमिका स्पष्ट असेल. मी कुणाला घाबरलो नाही, घाबरत नाही असं मत श्री‌. परब यांनी व्यक्त केले.


दरम्यान, नाव जाहीर न केल्यानं भाजपात हे लॅंडमाफीया आले किंवा असतील तर भुमिका काय अस विचारले असता संजू परब म्हणाले, या लॅंडमाफीयाला कधीही भाजपचे तिकीट मिळणार नाही. त्यांना काही मिळणार नाही. लवकरच नाव जाहीर करेन, निवडणूक जाहीर होताच सगळी माणसे आणून बसवतो. मात्र लॅंडमाफीयाला आमदारकी मिळणार नाही असं भाजप उपाध्यक्ष संजू परब यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, परिक्षित मांजरेकर, मोहीनी मडगावकर, संजय वरेरकर, विनोद सावंत, क्लेटस फर्नांडिस आदी उपस्थित होते.