
सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सावंतवाडी शहराचे माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचा वाढदिवस सोमवार १९ ऑगस्ट रोजी नगरपरिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात सकाळी ११ वाजता जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. या वाढदिवस सोहळ्याला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे उपस्थित राहणार आहेत. तरी या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपचे सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केले.
भारतीय जनता पार्टी, सह्याद्री फाउंडेशन व संजू परब मित्र मंडळ यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम साजरा करण्यात येणार असून वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी भाजपचे पदाधिकारी परीक्षित मांजरेकर, विनोद सावंत, हेमंत बांदेकर आदी उपस्थित होते.