
राजापूर : राष्ट्र सेविका समिति रत्नागिरीच्या रत्नकोंदण आणि रेणुका प्रतिष्ठानतर्फे आयोजित संत मीराबाई यांची रचना सादर करण्याच्या स्पर्धेत राजापूर शहरातील संजिवनी संदीप मालपेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गायिकानी सहभाग घेतला होता.
राष्ट्र सेविका समिति रत्नागिरीच्या रत्नकोंदण आणि रेणुका प्रतिष्ठानतर्फे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सौ. संजिवनी मालपेकर या राजापूर संभाजी पेठेतील मालपेकर ज्वेलर्स चे संदीप मालपेकर यांच्या पत्नी असुन गेली अनेक वर्ष त्या राधेशाम महिला भजन मंडळाच्या वतीने आपली भजन सेवा करत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल परिसरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन यामध्ये प्रथम क्रमांक सौ. संजिवनी मालपेकर, द्वितीय क्रमांक पुजा करमळकर, तृतीय क्रमांक अर्चना वैशंपायन यानी पटकावला असुन उत्तेजनार्थ चित्रा पराडकर आणि शर्वरी जोशी याना विभागुन देण्यात आला आहे.