खा. संजय राऊत उद्या सिंधुदुर्गात !

महाराजांच्या पुतळ्याची करणार पाहणी
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 29, 2024 10:07 AM
views 385  views

सिंधुदुर्गनगरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत हे मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी उद्या शुक्रवार दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. 

सकाळी ९  वा. चिपी विमानतळ येथे खास. संजय राउत यांचे आगमन होणार आहे. सकाळी १० वा. मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी ते करणार आहेत. १०.१५ वा. मालवण शासकीय विश्रामगृह (आरसेमहाल) येथे त्यांची पत्रकार परिषद होणार आहे.  आहे.  ११ ते २  वाजेपर्यंत कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय ता. मालवण येथे शिवसैनिकांचा मेळावा ते घेणार असून दुपारी ३  वा. मोपा विमानतळावरून मुंबईकडे रवाना होणार आहेत. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली आहे.