संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्षपदी गजानन नाटेकर

Edited by: भगवान शेलटे
Published on: December 29, 2023 14:49 PM
views 172  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या समिती अध्यक्षपदी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे खाजगी स्वीय सहाय्यक गजानन नाटेकर यांची निवड झाली आहे. नाटेकर हे यापूर्वी या समितीच्या सदस्यपदी २० वर्ष कार्यरत होते. त्यांच्या एकंदरीत कामकाज अनुभवावरून त्यांची अध्यक्षपदी पून्हा नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीवर महादेव उर्फ संजू पांगम, शिवानी दिनेश पाटकर,  प्रांजल प्रशांत जाधव,  शंकर संभाजी साळगावकर,  विनोद सुखदेव सावंत , संजय बाबुराव देसाई , साबाजी देऊ धुरी, सत्तार महंमद पटेल व शासकीय प्रतिनिधी म्हणून गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, मुख्याधिकारी सागर साळुंखे, सचिव तहसीलदार श्रीधर पाटील यांची नियुक्ती करत ही समिती गठित करण्यात आली आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शिफारसीनुसार ही समिती गठीत करण्यात आली आहे. सर्व समिती सदस्य व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.