
कणकवली : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज फोंडाघाटच्या मनस्या निलेश फाले हिने अमरावती येथे झालेल्या ऑल इंडिया सैनिक शुटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून राष्ट्रीय शुटिंग स्पर्धेसाठी निवड पक्की केली आहे.
या यशाबद्दल मनस्या हिची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. तर फोंडाघाट हायस्कुल येथे तिचा शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी फोंडाघाटच्या सरपंच सौ. संजना आग्रे उपस्थित होत्या. संजय आग्रे यांनी मनस्याच्या यशाचे कौतुक केले. ही मुलगी फोंडाघाटची शान आहे, असे आंग्रे म्हणाले.