तांबळडेगमधील खचलेल्या किनारपट्टीची संजय आग्रेंनी केली पाहणी

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 06, 2023 18:42 PM
views 701  views

देवगड : देवगड तालुक्यातील तांबळडेग येथील समुद्राला आलेल्या उदानामुळे येथील किनारपट्टीची धूप झाली आहे.यामुळे किनारपट्टी लगत असलेल्या वस्तीला धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी नव्याने करण्यात आलेला रस्ता देखील खचला आहे. तर या ठिकाणी असलेल्या माडांच्या झाडांची देखील किनारपट्टी खचल्याने धोका निर्माण झाला आहे. तसेच येथे रमेश सनये यांच्या घरा नजिक असलेल्या साई मंदिराला देखीलथोडाफार तडाखा बसला आहे. या ठिकाणी धुपप्रतीबंधक बंधारा नसल्याने येथील किनारपट्टी भागातील लोकवस्तीला भविष्यात धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

खचलेल्या किनारपट्टीची शनिवारी ५ ऑगस्ट रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी पाहणी करता येतील ग्रामस्थांची संवाद साधला. त्यावेळी मंजूर असलेल्या धूपप्रतिबंध बंधाऱ्याचे काम अद्याप का झाले नाही? असा सवाल येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला. यावेळी जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी याची सविस्तर माहिती घेऊन हा धुप प्रतिबंधक बंधारा लवकरच पूर्णत्वास जावा यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी येथील ग्रामस्थांना सांगितले. यावेळी शिवसेना देवगड विधानसभा संघटक संदेश पटेल तालुकाप्रमुख अमोल लोके व सहकारी, तांबळडेग माजी सरपंच लवेश भाबल उपस्थित होते.