स्वच्छता मूल्यमापन टीम कणकवलीत ; बसस्थानकाची पाहणी

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: July 29, 2025 20:07 PM
views 90  views

कणकवली : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियाना अंतर्गत कणकवली बसस्थानक स्थानकाचे स्वच्छतेचे मूल्यमापन करण्यासाठी मंगळवारी टीम आली होती. या टीमने कणकवली व फोंडा बसस्थानक परिसराची पाहणी केली. 

कोल्हापूर आगाराचे श्री. नागतोडे, श्री. भोसले यांच्यासह टीमने कणकवली व फोंडाघाट बसस्थानक परिसर स्वच्छ आहे की नाही याची पाहणी केली. स्थानक परिसरातील स्वच्छतागृहांची पाहणी केली. कणकवली बसस्थानक परिसरातील टीम पाहणी करतेवेळी आगार व्यवस्थापक अजय गायकवाड, सहाय्यक वाहतूक नियंत्रण अजित कदम, शिवाजी राठोड, श्रीनिवास कदम, वरिष्ठ लिपिक दिलीप जाधव, बाबू मुळदेकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. फोंडाघाट बसस्थानक येथे पाहणी करतेवेळी वाहतूक नियंत्रक गपू राठोड, संजू पवार, दिलीप जाधव उपस्थित होते. दोन्ही बसस्थानकांची पाहणी केल्यानंतर एसटीच्या अधिकारी व कर्मचाºयांना टीमने काही सूचना केल्या. फोंडाघाट बसस्थानक परिसरातील खड्डे बुजविण्याची सूचना त्यांनी केली.