
वैभववाडी : तालुक्यातील अनिरुद्ध शिक्षण प्रसारक मंडळाच्या अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी धनश्री अशोक कोरवी हिची ब्रिटानीया या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली आहे.तसेच या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांची जगभरातील नामवंत कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.
कोकणातील विद्यार्थ्याना सर्वोत्तम अन्नतंत्रज्ञानाचे शिक्षण वाजवी शुल्का मध्ये उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने श्री. अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ सांगुळवाडी या संस्थेने सन २०१३-१४मध्ये अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय सांगुळवाडी येथे सुरू केलं. या महाविद्यालयात गेल्या दहा वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण, पश्चिम महाराष्ट्रासहीत अन्य राज्यातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले.महाविद्यालयातून आतापर्यंत अन्नतंत्रज्ञान पदवी घेऊन उत्तीर्ण झालेल्या ९०टक्के विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झालेली आहे.याही वर्षी या महाविद्यालयाने या यशात सातत्य राखले आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील अंतिम वर्षाची परीक्षा दिलेल्या धनश्री कोरवी विद्यार्थीनीची ब्रिटानिया कंपनीत उत्पादन व्यवस्थापक म्हणून निवड झाली आहे. तिला ७ लाख रु. एवढे वार्षिक वेतनाच पॅकेज प्राप्त झाले आहे.
महाविद्यालयात शिक्षण घेतलेले विद्यार्थी आयटिसी, रिलायन्स रिटेल इंडस्ट्री, ब्रिटानिया, डि मार्ट, युनीटेड स्पीरीट, पेप्सी को, प्रोस्टेट फ्रोजन फुड, मॉगनीज, एस एसओ एम इंटरनॅशनल फुड, स्कायलीन फुड, पर्नोड रिचर्ड यांसारख्या नामांकित कंपनीत उत्पादन व्यवस्थापक, उत्पादन प्रभारी, गुणवत्ता व्यवस्थापक, गुणवत्ता प्रभारी, गुणवत्ता हमी व्यवस्थापक, गुणवत्ता नियंत्रक या उच्च पदांवर कार्यरत आहेत.यावर्षी धनश्री हिची निवड झाल्याबद्दल संस्थेचे संचालक संदीप पाटील, प्रशासकीय अधिकारी सुधाकर येवले ,प्राचार्य महेश कदम यांनी अभिनंदन केले आहे.तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.