
दोडामार्ग : झरेबांबर ग्रामपंचायत सदस्य तथा माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांच्या पत्नी सौं. संगिता अंकुश जाधव या आपल्या परिवारासह गेली अनेक वर्षे बांदा निमजगा येथे राहतात. आज दहीहंडी ची लगबग होती. सौं जाधव आणि माजी सभापती जाधव आज संध्याकाळी बांदा आळवाडी मच्छीमार्केटयेथून टू व्हीलर ने वेंगुर्ला जात होते. मात्र खूप मोठा पाऊस सुरु झाल्याने ते बांदा शेर्ला पुलाजवळून घरी येण्यास निघाले दरम्यान सौं जाधव यांना मोबाईल ची रिंग ऐकू आल्याने गाडी थांबवली. रस्त्याच्या कडेला गवतात मोबाईल सापडला.
मिळालेला मोबाईल ज्याचा असेल त्याला परत करूया असे जाधव यांनी ठरवले. पण मोबाईल चा डिस्पले खराब झाल्याने रिंग वाजूनही कोणालाच संपर्क करता येत नव्हतं. जाधव यांनी लगेच बांदा शहर मार्केट मध्ये काही लोकांना यांची कल्पना दिली. आळवाडी येथून थेट शेर्ला येथे काही दुकानात याबाबत कल्पना दिली. त्याच वेळी सिद्धार्थ नगर येथील प्रशांत जाधव यांना माजी सभापती जाधव यांनी मोबाईल सापडला आहे. कोणाचा असेल तर घरी आहे घेऊन जायला सांगा. प्रशांत जाधव यांनी दोन युवक पावसकर यांच्या हॉटेल मध्ये मोबाईल हरवला अशी चर्चा करत आहेत असे सांगितले. हॉटेल कडे जात त्या दोन युवकांनी आपलाच मोबाईल हरवला असे संगितलं ओप्पो कंपनी ओळख सांगितले.
निमजगा येथे जाधव राहत असलेल्या ठिकाणी निहाल अहमद राहणार बांदा मुस्लिम वाडी आले मोबाईल ची ओळख पटवून सांगितली. सदर मोबाईल आपले वडील सिराजउद्दीन आगा यांचा असल्याचे सांगितले. ते प्लम्बिंग चे काम कारणासाठी शेर्ला, निगुडे येथे गेले होते. घरी येताना त्यांच्याकडून मोबाईल हरवला. जाधव आपण सपंर्क होत नसतात ही भर पावसात बांदा आणि शेर्ला या ठिकाणी निरोप ठेवलात. त्यामुळे आपल्या वडिलांचा मोबाईल परत मिळू शकला. प्रामाणिक पणे मोबाईल परत केला त्याबद्दल सौं. जाधव आणि माजी समाजकल्याण सभापती जाधव यांचे आभार व्यक्त केले. जाधव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.