किंजवडेत ३ ऑगस्टला संगीत आरती स्पर्धा

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 30, 2025 19:31 PM
views 30  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधू भार्गव मित्रमंडळ व कलायन चॅरिटेबल ट्रस्ट किंजवडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सौ मंजिरी निरंजन दीक्षित पुरस्कृत संगीत आरती स्पर्धा ३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून किंजवडे येथील श्री देव हरभट्ट स्थानेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक दहा हजार व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक सात हजार व आकर्षक, तृतीय क्रमांक पाच हजार व आकर्षक तसेच उत्तेजनार्थ संघांसाठी ४ हजार व ३ हजार रुपये व चषक गौरविण्यात येणार आहे. पारंपारिक आरत्यांचे संवर्धन व प्रसार होऊन त्यांचे जतन व्हावे या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी ब्राह्मण न्याती बांधवांसाठी ही स्पर्धा आयोजित केली असेल त्या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी समीर रुणकर ९६७३१३००९५ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे