'आदर्श खेळाडू' पुरस्काराने संदेश रेडकर सन्मानित

उसप गावच्या सुपुत्राचा सन्मान
Edited by: संदीप देसाई
Published on: April 13, 2023 11:39 AM
views 214  views

दोडामार्ग : उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज व चपळ क्षेत्ररक्षक म्हणून क्रीडा क्षेत्रात नावजेलेल्या उसप गावच्या सुपुत्र संदेश गवस याला आदर्श खेळाडू या पुरस्काराने बुधवारी रात्री मांगेली येथे सन्मानीत करण्यात आले.

 मांगेली तळेवाडी येथील श्री महागणपती सिद्धीविनायक देवस्थान व कै. श्री. पांडुरंग गोविंद गवस प्रतिष्ठान तथा सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा  "आदर्श खेळाडू पुरस्कार " संदेश रेडकर बुधवारी प्रदान करण्यात आला.

आपल्या बुद्धिमत्तेचा प्रभाव पाडून कधीही आपल्या क्रीडा कौष्याल्याचा गर्व न करता क्रीडा क्षेत्रात सातत्याने आपल योगदान देणाऱ्या संदेश ला मिळालेल्या या पुरस्कराबद्दल उसप ग्रामस्थ व त्यांचे मित्र मंडळीतून अभिनंदन केलं जात आहे. तर श्री महागणपती सिद्धीविनायक देवस्थान व कै. श्री पांडुरंग गोविंद गवस प्रतिष्ठान तथा सेवाभावी संंस्था मांगेली - तळेवाडीचे सर्व पदाधिकारी यांचे आम्ही संदेश रेडकर मित्रमंडळ  यांनी आभार व्यक्त केले आहेत.