संदेश पारकर यांच्या वाढदिवस समाजोपयोगी कार्यक्रमांनी होणार साजरा...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 13, 2023 13:16 PM
views 175  views

कणकवली : शिवसेना नेते तथा कोकण सिंचन महामंडाळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांचा वाढदिवसानिमित्त शुक्रवार १४ जुलै विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ सकाळी ७ वा. कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त भगवती मंगल कार्यालयात येथे सकाळी १०.३० वा. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. कणकवली शहरातील महिला बचत गटांना छत्र्यांचे वाटप, दिव्यांगांना भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. रक्तदात्यांना छत्री भेटवस्तू दिली जाणार आहे.

या कार्यक्रमाला शिवसेनेचे सचिव तथा खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते तथा माजी मंत्री भास्कर जाधव, आमदार वैभव नाईक, जिल्हासंपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेनेचे नेते अतुल रावराणे, सतीश सावंत, संजय पडते, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख शैलेश परब, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, महिला आघाडी प्रमुख नीलम सावंत - पालव, जान्हवी सावंत, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, मंदार शिरसाट, कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, डॉ. प्रथमेश सावंत, देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, जयेश नर, वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके, नंदू शिंदे, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, बाबूराव धुरी, वेंगुर्ले तालुकाप्रमुख बाळू परब, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी, माजी जि. पं. सदस्य, सभापती, पंचायत समिती सदस्य, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांना शिवसैनिक व संदेशप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.