संदेश पारकरांच्या प्रचारार्थ पुरळमध्ये बैठका

Edited by:
Published on: November 07, 2024 15:59 PM
views 205  views

सिंधुदुर्ग : पुरळ गावात ठीक ठिकाणी संदेश भाई पारकर यांच्या प्रचारार्थ होतात बैठका. यावेळी श्याम सुंदर पुजारे, पुरळ सरपंच तावडे मॅडम, श्रीनिवास मराठे यांच्या घरी दिल्या भेटी. 10 वर्ष येथील भागात काहीच प्रगती झाली नाही. येथील स्थानिक आमदाराने लोकांच्या तोंडाला पान पुसण्याचे काम केलं. या भागातील तरुणांना गेल्या दहा वर्षात कोणत्याही प्रकारचा रोजगार देऊ शकला नाही आणि स्थानिकांना कोणते प्रकारचे काम देऊ शकला नाही अशा आमदाराला येत्या विधानसभेच्या निवडणुकीला कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही असा निश्चय या बैठकीत करण्यात आला. भूलथापा मारणारे आमदारांपेक्षा सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी कायमचं उभा राहणारा संदेश पारकर सारखा आमदार पाहिजे असे उद्गार जमलेल्या नागरिकांनी काढले.

त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये संदेश पारकर यांना या प्रभागातून शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत संतोष तावडे,मनोहर पुजारे, सुनील डोगरे, राजेंद्र पुजारे, दिनकर पुजारे, सुनिल पुजारे आणी ग्रामस्थ उपस्थित होते.