सासोली प्रकरण ; दादागिरी खपवून घेणार नाही

संदेश पारकरांचा इशारा
Edited by: संदीप देसाई
Published on: September 24, 2024 14:51 PM
views 205  views

दोडामार्ग : तब्बल १७ महिने सासोली प्रशनी न्याय देण्यास प्रशासनाने दिरंगाई केली. मात्र आजच्या आंदोलनाने तरी प्रशासनाने डोळे उघडावेत. जे दोषी आहेत त्यांचेवर कडक कारवाई करावी. अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीतील अतिक्रमण हटवून देण्यासाठी आम्हांला आमच्या स्टाईलने त्या जमिनीत उतरावे लागेल. त्यावेळी मात्र प्रशासनाने आम्हांला आडकटी करण्यासाठी पुढे येऊ नये असा सज्जड ईशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी प्रशासनाला दिला आहे.

   सासोली जमीन प्रश्न घेऊन संदेश पारकर यांनी मंगळवारी सर्वपक्षीय व सामाजिक कार्यकर्ते आणि सासोली ग्रामस्थ यांना सोबत घेत जनआंदोलन पुकारलं होत. सकाळी दोडामार्ग बाजारपेठ येथून 11. 30 वाजता जनआंदोलनास सुरवात झाली. सर्व प्रथम श्री पिंपळेश्वर चरणी नतमस्तक होऊन छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरवात झाली. जोरदार घोषणा बाजी करीत आणि संदेश पारकर यांना समर्थन देत बाजरपेठ येथून ही रॅली तहसील कार्यालयाकडे निघाली. उपस्थितांची संख्या मर्यादित असली तरी संदेश पारकर यांनी जन आंदोलन काय असतें हेच आजच्या आंदोलनातुन दाखवून दिले. पारकर यांच्या आंदोलन पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलिसांनी मोठा फौज फाटा तैनात करून कडक बंदोबस्त ठेवला होता. मात्र मोठ्या ताकदीने घोषणा बाजी करत आंदोलन तहसील आवारात पोहचले. यावेळी पोलिसांनी या आंदोलनाला अडवण्याची भूमिका घेतली. मात्र पोलिसांना सामोरे जात पारकर यांनी आम्हाला तहसीलदार यांच्याशी चर्चा करयाची आहे. ते जोवर आमच्याशी चर्चा करणार नाहीत तोवर तेथून हलणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला.

  अखेर पोलीस निरीक्षक ओंकार ओतारी यांनी तहसीलदार अमोल पोवार यांना आंदोलकांची मागणी बाबत कल्पना दिली. त्यावेळी चर्चा करण्यासाठी ते बाहेर आले मात्र तोडगा निघाला नाही शेवटी तहसीलदार यांनी पारकर व काही मोजक्या आंदोलनकर्त्यांना आपल्या दालनात चर्चेकरिता बोलावले. यावेळी पारकर यांनी तहसीलदार अमोल पोवार, पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, बिडीओ सावंत यांच्या उपस्थितीत महसूल, वनविभाग, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक यां सर्व अधिकाऱ्यांवर प्रश्नाचे भाडीमार करत त्यांना फैलाव घेतले. 

  आपण याबाबत समाधानी नसून सर्वांची खातेनिहाय व आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली. तत्कालीन तहसीलदार यांनी दिलेल्या आकृषिक सनदा रद्द कराव्यात, व महसूल, वन, दुय्यम निबंधक, पोलीस, भूमी अभिलेख या खात्यातील जे अधिकारी, कर्मचारी दोषी आहेत यांची खाते निहाय चौकशी करून त्यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी होऊन संबंधित दोषीवर नीलंबन व गुन्हे दाखल झाले पाहिजे असे पारकर यांनी तहसीलदार पोवार यांना बजावून सांगितले. आता तुमच्याने काही होत नसेल तर आम्हाला आमची स्टाईल वापरावी लागेल. त्यामुळे प्रशासनाने सुधारावे आपल्यावर ती वेळ आणू देऊ नये. स्थानिकाना न्याय देण्यासाठी मी हा लढा सुरूच ठेवणार असल्याचे ते कडाडले आहेत. 


प्रसंगी पालकमंत्री यांच्या दरबारात आवाज उठवणार

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा जनता दरबार असल्याने आपण जिल्ह्यात असल्यास सासोली ग्रामस्थांना सोबत घेत त्यांचे लक्षही वेधणार असल्याचे पारकर यांनी म्हटले आहे. 


मी शिवसेनेचा लीडर

आंदोलनात कोण सहभागी झालं आणि कोणी नाही हे महत्वाचे नाही. आपल्या शेतकऱ्यांवर, भूमीपुत्रावर अन्याय झाला. त्यांना न्याय मिळवून देणे महत्वाचे आहे. आणि आपण शिवसेनेचा लीडर असल्याने माझं एकच ध्येय की या लोकांना न्याय मिळवून देणार. बाकी मी काहीही खपवून घेणार नाही. या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख बांबूराव धुरी सहभागी झाले नसले तरी, तालुका प्रमुख संजय गवस सहभागी झाले होते. काँग्रेसचे सुभाष दळवी, संजय नाईक, मनसेचे सुनील गवस यांचा सहभाग होता. 

 दादागिरी खपवून घेणार नाही

दरम्यान ओरीजिन सासोली कंपनीला पुन्हा एकदा संदेश पारकर यांनी ईशारा दिला आहे. वेळीच सुधरा, दादागिरी करून दाखवला तर आम्ही मुळीच खपवून घेणार नाही. हा लढा जनतेचा आहे. माझा विकासाला मुळीच विरोध नाही. मात्र जनतेला फसवून जमिनी बळकावण्याचा प्रयन्त करत असाल तर लक्षात ठेवा, मी फक्त निमित्त आहे. या आंदोलनाचा लढा इथल्या सासोली वासियांचा आहे. आणि त्यांना न्याय दिल्या शिवाय गप्प बसणार नाही असा इशारा पारकर यांनी दिला आहे.


पालमंत्र्यांच्या जनता दरबारात जाब विचारणार

दरम्याना पारकर बोलताना म्हणाले 27 तारीखला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा जनता दरबार आहे त्या जनता दरबारात मी सर्व सासोली ग्रामस्थांना घेऊन जाईन आणि पालकमंत्र्यांना जाब विचारून त्यांना न्याय देण्याच काम करणार आहे. मी जनतेच्या पाठशी आहे त्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत मिळाल्याच पाहिजे. माझा विकासाला विरोध नाही मी जनतेला  नायाय देण्यासाठी रस्त्यावर उतरलो.


पुरावा द्या, नोकरीचा राजीनामा देतो : तहसीलदार अमोल पोवार

आपण परप्रांतीयांना पाठीशी घालता, महसूल प्रशासन त्यांच्या दावणीला बांधलं आहे. अशा आशयचा पारकार यांनी हल्ला चढविताच त्याला तहसीलदार पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. मी कोणाही परप्रांतीयांना ओळखत नाही. भलतेच आरोप करू माझ्यावर करू नका. आपण करत आसलेल्या आरोपांचा एक पुरावा द्या. मी राजीनामा देऊन नोकरी नोकरी सोडतो असं प्रति आव्हान दिलं. कर्मचाऱ्यांना कारवाईचे माझ्याकडे कोणतेही अधिकार नाही. हे सर्व अधिकार वरिष्ठ पातळीवर आहेत. त्यामुळे आपल्या मागाण्यांचा अहवाल मी वरिष्ठ पातळीवर पाठवीन अशी भूमिका तहसीलदार पोवार यांनी घेतली.

पारकराचं आंदोलन ठरलं लक्षवेधी

खरंतर आपला बालेकिल्ला सोडून दुसऱ्या तालुक्यात नव्हे तर विधानसभा मतदार संघात आप्तस्वकी्यांचा विरोध पत्करून असं जन आंदोलन उभारण तेवढी साधी सरळ गोष्ट नव्हती. मात्र संदेश पारकर यांनी सासोली वासियांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी जे आंदोलन छेडलं ते तितक्याच ताकदीने आणि अभ्यासपूर्ण शैलीनं पूर्णत्वास नेलं नव्हे तर ते खऱ्या अर्थाने लक्षवेधी बनवलं.