हिम्मत असेल तर विकासावर मते मागा

नितेश राणेंना पारकरांचं चॅलेंज
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 17, 2024 18:23 PM
views 184  views

देवगड : महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देवगडात //  उमेदवार संदेश पारकर यांचं भाषण // २३ तारीखला विजयाचा गुलाल आपल्याला उडवायचा आहे // या मतदारसंघाला एक आदर्श होता // येथे सुसंस्कृत पणा जपला होता // मात्र गेल्या काही वर्षांपासून हे सगळं संपलय // जर यांनी विकास केला असेल तर गावा गावात पैसे का वाटतात // हिम्मत असेल तर विकासावर मते मागा // नितेश राणेंना दिलं आव्हान // ३५वर्षे सर्वसामान्यांचा आवाज दबला // हा आवाज बुलंद करण्यासाठी सर्वसामान्य माणूस विधानसभेत गेला पाहिजे // मी आमदार म्हणजे तुम्ही आमदार // यासाठी मला निवडून द्यायला हवे // राणेंचे दलाल पैसे वाटून मत मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत // तुम्ही कितीही पैसे द्या आता जनतेने निवडणूक हाती घेतली // त्यामुळे नितेश राणेंचा पराभव निश्चित आहे // पराभव दिसू लागल्यानेच त्यांनी माझ्या विरोधात दोन उमेदवार उभे केले // छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केला // महाराजांनी बांधलेल्या गड किल्ल्याचा एक बुरुज ढासळला नाही // यांनी बांधलेला पुतळा आठ महिन्यांत कोसळला // भ्रष्टाचार करणाऱ्यांना घरी बसायची वेळ आली आहे // तुमचे चार दिवस मला द्या // पुढील पाच वर्षे मी तुम्हाला देईन//संदेश पारकर यांनी केलं आवाहन //