शिरगावात संदेश पारकरांनी घेतल्या ग्रामस्थांच्या गाठीभेटी !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 06, 2024 13:51 PM
views 239  views

देवगड  : महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी देवगड तालुक्यातील शिरगाव मधील  संजय राणे आणि जितू राणे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका अध्यक्ष मिलिंद साटम, संतोष राणे, विनायक सतरकर, जितेंद्र सतरकर, जयेश राऊळ, जगदीश राऊळ, बाळकृष्ण चव्हाण,नाना सतरकर, साहिल राणे, जितू राणे महिला भगिनी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. निमतवाडीतील 100% संदेश पारकर यांनाच मतदान करणार असा निश्चय करण्यात आला. मी आमदार तर तुम्ही आमदार या टॅगलाईनची गावात जोरदार चर्चा सुरू होती.