
वेंगुर्ले : वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांनी नुकतीच मुंबई मातोश्री येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे निकम हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतच असल्याचे स्पष्ट झाले असून आगामी नगरपालिका निवडणुकीत याचा मोठा फायदा पक्षाला होणार आहे.
खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत संदेश निकम यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते गौरीशंकर खोत, सतीश सावंत, संदेश पारकर, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख शैलेश परब, तालुकाप्रमुख यशवंत परब, शहर प्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख प्रकाश गडेकर, श्री नार्वेकर आदी उपस्थित होते.
संदेश निकम यांचे वेंगुर्ला तालुक्यात मोठे सामाजिक कार्य आहे तसेच त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. याचा फायदा निश्चितच आगामी निवडणुकीत पक्षाला होणार यात शंका नाही.