बांदा मंडल ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी संदीप नेमळेकर

Edited by: विनायक गांवस
Published on: September 09, 2025 13:23 PM
views 112  views

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीचे बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर यांनी संदीप गोपाळ नेमळेकर यांची बांदा मंडल ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड केली आहे.      

    

भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी संदीप नेमळेकर यांना निवडीचे पत्र देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, महेश धुरी, सचिन बिर्जे, मधुकर देसाई, उमेश पेडणेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या नियुक्तीमुळे बांदा परिसरातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. भाजपच्या ओबीसी मोर्चाला या निवडीमुळे अधिक बळकटी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावेळी बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर यांच्यासह भाजपचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.