संदीप कुडतरकर नारायण राणेंचे उमेदवार प्रतिनिधी !

Edited by: विनायक गांवस
Published on: April 20, 2024 09:11 AM
views 818  views

सावंतवाडी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे उमेदवार प्रतिनिधी म्हणून सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्ते, राणेंचे निकटवर्तीय संदीप कुडतरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रतिनिधी म्हणून ते काम पहाणार आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजय निश्चित असून अडीच लाखांपेक्षा अधिक मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास संदीप कुडतरकर यांनी व्यक्त केला आहे‌.