LIVE UPDATES

चिपळूण नायशीच्या सरपंचपदी संदीप घाग

Edited by: मनोज पवार
Published on: June 07, 2025 12:22 PM
views 100  views

सावर्डे : चिपळूण तालुक्यातील नायशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संदीप बळीराम घाग यांची निवड करण्यात आली आहेत. त्यांच्या या निवडीने परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संदीप घाग यांचा सावर्डे परिसरात चांगला जनसंपर्क आहे. तसेच सन 2005 ते 2010  या कालावधीत नायशी ग्रामपंचायतीचे सदस्य होते. 2020 ते मे  2025 या कालावधीत उपसरपंच म्हणून त्यांनी पदभार सांभाळला. ग्रामपंचायत क्षेत्रात त्यांचा चांगला अभ्यास आहे. अधिकारी वर्गापासून अगदी सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत त्यांचे सलोख्याचे सबंध आहेत. सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी ते कायम धडपडत असतात. त्यांनी आपल्या आपल्या माध्यमातून अनेकांची निस्वार्थी वृत्तीने कामे केली आहेत. 

आमदार किरण सामंत हे त्यांचे प्रेरणास्थान आहेत असे त्यांनी सांगितले.  त्याच्या माध्यमातून गावात 20 लाखा ची काम पूर्ण केली असून तसेच चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच जवळ कार्यकर्ते मानले जातात. 

डेरवण रुग्णालय व अप्रांत रुग्णालय चिपळूण जिल्हा व जिल्हाबाहेरील रुग्णाना  मदत करत विनामूल्य रुग्णसेवा गेली अनेक वर्षे करत असून गत 25 वर्ष पत्रकारिता करीत असून गेले वर्षभर ते ग्रामीण वार्ता या डिजिटल मीडियाचे पत्रकार म्हणून सावर्डे परिसरातील वृत्तांकन करत आहेत. शाळा, महाविद्यालय, डेरवण रुग्णालयातील सर्वसामान्यासाठीच्या आरोग्य विषयक योजना, त्याची माहिती, शस्त्रक्रिया आदी त्यांनी ग्रामीण वार्ता च्या माध्यमातून लोकांपर्यत पोहोचवल्या आहेत. 

त्यांच्या निवडीने योग्य उमेदवाराची सरपंच पदासाठी निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.