
सावंतवाडी : माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांचा वाढदिवस सेवाभावातून साजरा करण्यात आला. आंबोली मतदारसंघासह तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये वाढदिवसाच औचित्य साधून विद्यार्थांना वह्या वाटप करण्यात आल्या. सेवा समर्पणाच हे सलग ६ व वर्ष आहे. आज शितपवाडी धनगरवाडी सरमळे येथे वह्या वाटप करण्यात आल. यावेळी शालेय मुलांसोबत संदीप गावडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांच्या पुढाकारातून आंबोली जिल्हा परिषद मधील ३५ शाळांमधील १२७५ विद्यार्थ्यांना तब्बल ८५३३ मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. सेवा समर्पण सातत्याच हे सलग ६ वर्ष आहे. चौकुळसह आंबोलीतील जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. मळगाव येथे देखील हा उपक्रम राबविण्यात आला.सेवाभावातून गेली सहा वर्ष हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना कोणतीही कमी पडू नये यासाठी हा उपक्रम राबवित असल्याचे मत माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी व्यक्त केले.