संदीप गावडे 'किंगमेकर' !

विलवडे, कोनशी-दाभिळ, केसरी-फणसवडे,भालावल,गेळे, दाणोलीत 'भाजप'च्या विचाराचे सरपंच आणले निवडून !
Edited by: विनायक गांवस
Published on: December 21, 2022 11:54 AM
views 346  views

सावंतवाडी : भाजपचे आंबोली मंडल माजी तालुकाध्यक्ष तथा विद्यमान केसरी-विलवडे पंचायत समिती मतदारसंघाचे सदस्य, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे समर्थक संदीप गावडे आपल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतीवर भाजपच्या विचारांचा सरपंच बसवत किंगमेकर ठरलेत.


 त्यांनी विलवडे, कोनशी-दाभिळ, केसरी-फणसवडे,भालावल,गेळे, दाणोलीत 'भाजप'च्या विचाराचे सरपंच निवडून आणले आहेत‌. तर पारपोलीत गाव विकास आघाडीच पॅंनल निवडून आले आहे. विलवडे प्रकाश दळवी, कोनशीत साधना शेट्ये, केसरी स्नेहल कासले, भालावल समीर परब,गेळेत बिनविरोध सागर ढोकरे, दाणोलीत चंद्रोजी सावंत हे सरपंच पदी विराजमान झाले आहेत.


संदीप गावडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने या ठिकाणी यश मिळवील असून विजयानंतर कार्यकर्त्यांनी संदीप गावडे यांना उचलून घेत एकच जल्लोष केला आहे. या ठिकाणी भाजप विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगला होता. यात संदीप गावडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुरस्कृत पॅनलने विजय प्राप्त केला आहे. मात्र, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे समर्थक आणि माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संदीप गावडे यांनी भाजपला मिळवून दिलेल यश निर्णायक ठरणार आहे.‌